वाचनाच्या अध्यापन पद्धती - Teaching methods of reading
वाचनाच्या अध्यापन पद्धती - Teaching methods of reading
वाचन शिकवण्याच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
1) मूळाक्षर पद्धती : या पद्धतीत लेखन व वाचन एकदाच शिकवले जाते. प्रथम पाटीवर एक एक मूळाक्षर काढून ते विद्यार्थ्याकडून गिरवून घेतले जाते. ते गिरवतांना त्याच उच्चार करून घेतला जातो. मूळाक्षरानंतर बाराखडी, जोडाक्षर, शब्द व वाक्य यांचे क्रमाने वाचन शिकविले जाते.
दोष :
(1) मुळाक्षरावर भर असल्यामुळे विद्यार्थी एक एक अक्षर सुटे सुटे वाचतात. यामुळे शब्दांचा योग्य उच्चार व स्वराघात चुकतो.
(2) अर्थाला महत्त्व नाही.
(3) वाचन कौशल्याचा विकास मंद गतीने होतो.
1) गटपद्धती :
मूळाक्षर पद्धतीची सुधारलेली आवृत्ती म्हणजे गटपद्धती होय. या पद्धतीत सारख्या आकारांच्या अक्षरांचे गट पाडले जातात. या गटातील प्रत्येक अक्षरांची स्वतंत्रपणे ओळख करून दिली जाते. चित्रांच्या साहाय्याने एकेका अक्षरांचा अर्थ कृत्रिमरित्या आणला जातो.
उदा. न नळाचा, गगवताचा. गटातील सर्व अक्षरांचे लेखन व उच्चारांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्या-त्या गटातील अक्षरांचा वापर करून शब्दांचे वाचन शिकविले जाते. उदा. नमन
2) शब्दपद्धती :
या पद्धतीत एक एक अक्षर किंवा गट घेण्याऐवजी एकेक अर्थपूर्ण शब्द घेतला जातो. 'अ' 'आ' 'इ' असे अक्षरज्ञान देण्यापेक्षा अननस, आगगाडी, इमारत या शब्दातून अक्षरज्ञान दिले जाते.
3) वाक्यपद्धती :
या पद्धतीत शब्दाऐवजी विद्यार्थ्यांसमोर वाक्य ठेवले जाते. त्यासाठी शब्दपट्टयांचा वापर करून लहान लहान वाक्ये जुळवून वाचन शिकविले जाते. या वाक्याचे वाचन शिक्षक करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सामूहिक व वैयक्तिक वाचन होते. त्यानंतर वाक्यातील प्रत्येक शब्द वेगळा करून त्याचा परिचय करून दिला जातो.
4) प्रसंग पद्धती :
या पद्धतीत एखादा शैक्षणिक प्रसंग निवडून किंवा तसे वातावरण तयार करून विद्यार्थ्यासमोर छोटी-छोटी वाक्य चित्रित केली जातात. पूर्ण वाक्य देऊन त्यावर वाचन शिकविले जाते. यासाठी प्रत्यक्ष प्रसंग निर्माण केला जातो किंवा चित्राच्या साहाय्याने प्रसंगाचे वातावरण तयार केले जाते. उदा. कमल नमन कर विद्यार्थ्यांकडून नमन करण्याचा प्रसंग घडवून आणणे.
वाचन दोष व उपाय : प्रमुख वाचनदोष पुढीलप्रमाणे आहेत.
1) अपुरे संवेदन:
जे वाचले त्याला पूर्ण अर्थ लक्षात न येता अर्धवट अर्थ लक्षात येणे म्हणजे अपुरे संवेदन होय. हा दोष कमी शब्दसाठा असल्यामुळे निर्माण होतो. उपाय: दृष्टीची कक्षा वाढविण्याची सवय लावणे. शब्दसंग्रह वाढविणे.
2) निकृष्ट संवेदन :
अवघड, आशय, कमी विषयज्ञान असल्यामुळे जे वाचले त्याच्या अर्थाचे आकलन होत नाही. त्याला निकृष्ट संवेदन म्हणतात.
उपाय : विषयज्ञान वाढविणे, शब्दसंग्रह वाढविणे.
3) सदोष उच्चारण :
वाचत असताना अस्पष्ट व चुकीचे उच्चार करणे म्हणजे सदोष उच्चारण होय. दृष्टिदोष, वाचादोष, अज्ञान व निष्काळजीपणामुळे हा दोष निर्माण होतो.
उपाय : उच्चारांचे ज्ञान देणे, उच्चारांचा सराव करून घेणे. उच्चार करतांना काळजी घेणे.
4) एकेक शब्द वाचणे :
सलग वाचन न करता एकेक शब्द तुटकपणे वाचणे. मर्यादित दृष्टिकक्षा, अज्ञान व सवय यामुळे हा दोष निर्माण होतो. उपाय : वाचनाच्या निकोप सवयी शिकविणे, दृष्टिकक्षा वाढविण्यास शिकवणे.
3. शब्दावरून बोट फिरविणे :
सवय व अज्ञानपणामुळे वाचन करत असताना शब्दावरून बोट फिरविणे. उपाय : वाचनाच्या निकोप सवयी शिकवणे.
4. शब्द गाळणे :
वाचनातील काही शब्द गाळणे, दृष्टिदोष, निष्काळजीपणा व घाईगडबड करणे यामुळे दोष निर्माण होतो. उपाय: सूक्ष्म वाचनाची सवय लावणे, योग्य गतीने वाचनाची सवय लावणे.
5. सदोष विराम :
वाचन करत असताना विरामचिन्हांच्या ठिकाणी विराम न घेता इतर ठिकाणी घेणे. हा दोष अज्ञानामुळे निर्माण होतो.
उपाय : विरामचिन्हांचे ज्ञान देणे.
वार्तालाप में शामिल हों