पाठ्यपुस्तकांची समीक्षा व तुलनात्मक विश्लेषण - Textbook review and comparative analysis
पाठ्यपुस्तकांची समीक्षा व तुलनात्मक विश्लेषण - Textbook review and comparative analysis
महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र राज्य) द्वारे इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची रचना व निर्मिती करते. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर तो अभ्यासक्रम निर्मितीच्या तत्त्वानुसार तयार झाला आहे वा नाही हे पहाणे म्हणजे पाठ्यपुस्तकांची समीक्षा होय. आदर्श पाठ्यपुस्तकांच्या निकषानुसार पाठ्यपुस्तकाची तपासणी करणे म्हणजे पाठ्यपुस्तकांची समीक्षा व तुलनात्मक विश्लेषण करणे होय.
पाठ्यपुस्तकांची समीक्षा व तुलनात्मक विश्लेषण
पाठ्यपुस्तक हे मातृभाषेच्या अध्ययन-अध्यापनाचे प्रभावी साधन आहे "मुद्रित स्वरूपातील शिक्षक" म्हणूनच पाठ्यपुस्ताकचे वर्णन प्रामुख्याने केले जाते. पाठ्यपुस्तके ही अभ्यासक्रमाचा मूळ आधार असते. समग्र शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याने पाठ्यपुस्तकाची रचना करतांना बालक हाच केंद्रस्थानी मानला जातो. आदर्श पाठ्यपुस्तकाचे अंतरंग आणि बहिरंग यासंबंधीच्या निकषाच्या आधारे दर्जेदार पाठ्यपुस्तके निर्माण केली जातात. बहिरंगातून आनंदप्राप्ती आणि अंतरंगातून ज्ञानप्राप्ती मिळविणे पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीचे ध्येय असते. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंग व बहिरंगाच्या वैशिष्ट्याच्या आधारे पाठ्यपुस्तकाची समीक्षा व तुलनात्मक विश्लेषण करता येईल.
वार्तालाप में शामिल हों