ध्वनिभेद करणे - To distinguish

ध्वनिभेद करणे - To distinguish


विद्यार्थ्यांच्या ध्वनीतील फरक ओळखण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन या तंत्राद्वारे केले जाते. उदा. अ) शब्द ऐका व दीर्घ ईकार-ऊकार ओळखा ?

दीन, दिन, सूर, सुर


ब) शब्द ऐका व प' ध्वनी नसलेले शब्द सांगा ?

नयन, पलंग, विमल, पतंग


शब्दसंपत्ती : श्रवणातून शब्दसंग्रहाचे मूल्यमापन तंत्र


उदा. अ) शब्द ऐका व त्याचे समानार्थी शब्द सांगा ?

आई, वडील


ब) शब्द ऐका व त्याचे विरुद्धार्थी शब्द सांगा ?

मित्र, विजय


वाक्यरचना : श्रवणातून वाक्यरचनेच्या ज्ञानाचे मूल्यमापन तंत्र


उदा. वाक्य ऐका व वाक्यातील दोष सांगा ?

ती मुलीचे नाव शीला आहे. 


आकलन : श्रवणातून आकलन मूल्यमापन तंत्र


उदा. एखादा उतारा विद्यार्थ्यांना श्रवण करायला लावून प्रश्न विचारणे.


नोंदी व पडताळा सूची :


वरील श्रवण मूल्यमापनाच्या तंत्राद्वारे मिळालेली विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याची प्रगती शिक्षकाने नोंदवून त्याची पडताळा सूची तयार करावी.