अध्यापन प्रक्रीयेत आधुनिक अध्यापन पद्धती व तंत्राचा उपयोग - Use of modern teaching methods and techniques in the teaching process
अध्यापन प्रक्रीयेत आधुनिक अध्यापन पद्धती व तंत्राचा उपयोग - Use of modern teaching methods and techniques in the teaching process
(Uses of Modern Teaching Methods & Techniques In Teaching Process)
पाठाची रचना, पाठाचा प्रकार, इयत्ता, विद्यार्थी क्षमता इ. नुसार अध्यापन पद्धती व तंत्र वापरण्याचा शिक्षकांचा स्वतंत्र अधिकार असतो. मराठी भाषेच्या शिक्षकाने अध्यापनाच्या विविध पद्धती व तंत्राची माहिती समजून घेवून अध्यापनात त्याचा उपयोग केल्यास अध्यापन रंजक, प्रभावी, नाविन्यपूर्ण होते. नवनवीन अध्यापन पद्धतीच्या उपयोगावर अध्यापनाची व अध्ययनाची यशस्विता अवलंबून असते. अध्यापन प्रक्रियेत आधुनिक पद्धतीचे विविध उपयोग होतात, ते पुढीलप्रमाणे -
अध्यापन प्रक्रियेत आधुनिक पद्धती व तंत्राचे विविध उपयोग :
प्रभावी अध्यापन :पाठाची रचना, पाठाचा प्रकार, इयत्ता, विद्यार्थी क्षमता इ. नुसार अध्यापन पद्धती व तंत्राची योग्य निवड केल्यास शिक्षकाचे अध्यापन प्रभावी होते. अध्यापन प्रभावी होण्याकरिता शैक्षणिक साधनाचा वापरही महत्त्वपूर्ण ठरतो.
संस्कारक्षम अध्यापन : अध्यापकाची इच्छा असते की अध्यापन करताना ते विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडावे. मातृभाषेचे अध्यापन करताना प्रभावी व्हावे, संस्कारक्षम व्हावे. कथाकथन ही ज्ञान प्राप्तीची प्राचीन पद्धती आहे. परींच्या कथा, महापुरुषांच्या कथा, पौराणिक कथा, साहस कथा इ. प्रकारच्या कथाकथनातून हास्यनिर्मिती, बोधनिर्मिती, मूल्यनिर्मिती, संस्कारनिर्मिती घडून येते. गतिमान अध्यापन विद्यार्थ्याचे अध्ययन गतिमान करू शकणारे अध्यापन प्रभावी अध्यापन मानले जाते. अध्यापन गतिमान होण्यासाठी त्याला मानसशास्त्रीय बैठक असावी लागते. अध्यापनाच्या विविध पद्धतीचा उपयोग करतांना विद्यार्थ्यांचे वय, बौद्धिक क्षमता याचाही विचार करावा लागतो.
शैक्षनिक साधनाचा वापर : तक्ते, नकाशे, ग्लोब, चित्र, बाहुली नाट्य, दृकश्राव्य साधने इ. द्वारा अध्ययन- अध्यापनात रंजकता आणता येते. शैक्षणिक साधनाची विविधता विद्यार्थ्यांच्या अवधान केंद्रीकरणात सहाय्यक ठरते. रेडीओ, टेप रिकार्ड,
सी. डी. प्लेअर, डी. व्ही. डी. प्लेयर, दूरदर्शन, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल), इंटरनेट इ. तंत्र विज्ञानाच्या साधनाचा योग्य वापराने अध्ययन अध्यापन प्रभावी करता येते.
विद्यार्थी केंद्रितता : आजची शिक्षण पद्धती शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित बनली आहे. शिक्षणाचे निर्धारित उद्देश्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय. संपूर्ण शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित बनली आहे.
अवधान केंद्रीकरण : विद्यार्थ्यांना समजेल अशा उदाहरणे दाखले, कथा प्रसंग- गोष्टी याची निवड करावी. त्यातून निश्चित अर्थबोध होवून विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित होईल. शैक्षणिक साधनाचा योग्य उपयोग अवधान केंद्रीकरणाकरिता करता येते. शिक्षकाची हालचाल, हावभाव, आवाजातील चढउतार याद्वारेही अवधान केंद्रित करता येते.
स्वयं अध्ययन :स्वतः अभ्यास करून यश प्राप्तीचा आत्मविश्वास प्राप्त करता येतो. पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, ज्ञान कोश, मासिके, वर्तमान पत्र, माहिती तंत्रज्ञानाची विविध साधने याद्वारे स्वयं अध्ययन करू शकतात. स्वयं अध्ययन हे अध्ययनाचे अभिनव तंत्र आहे. अध्ययन सातत्य व वृद्धी करिता स्वयं अध्ययन महत्त्वपूर्ण आहे.
मानसशास्त्रीय बैठक :विद्यार्थ्यांचे वय, बौद्धिक क्षमता याचाही विचार करावा लागतो. विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान, बौद्धिक पातळी, क्षमता, अनुभव ईत्यादी बाबी लक्षात घ्याव्या लागतात. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, वय, बुद्धी, भावनिक क्षमता, वैचारिक पातळी इत्यादीचा विचार करून अध्यापन पद्धती व तंत्राची निवड करावी लागते.
रंजकता : विविध उदाहरणांनी, दाखल्यांनी कथांनी प्रसंगांनी व्याख्यानात रंजकता आणावी लागते. सहजता, स्पष्टपणा, आवाजातील चढउतार, विनोदप्रचुर, मुद्यांची मांडणी, पूर्वनियोजन, तयारी व्यवस्थित असावी लागते. विषयांतर टाळून बोलण्यात रंजकता, विनोद बुद्धी, सहजता असेल, उदाहरणे, दृष्टांत देण्यात हातखंडा असेल तर संवाद चांगले होते व त्याचा परिणामही विद्यार्थ्यावर उत्तम व प्रभावी होतो.
व्यक्तिमत्व विकास : विद्यार्थ्याचा 'व्यक्तिमत्व विकास हे शिक्षणाचे प्रधान उद्देश्य आहे. शाळा हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यार्थाचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक, वैचारिक इ. अंगाचा विकास शिक्षणाच्या माद्यमातून अपेक्षित आहे. शिक्षणातून उज्वल नागरिकांची निर्मिती करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे.
वार्तालाप में शामिल हों