लेखनदोष व उपाय - writing defects and remedies
लेखनदोष व उपाय - writing defects and remedies
लेखन करताना सुलेखनासंबंधी व शुद्धलेखनासंबंधी दोष निर्माण होतात.
अ) शुद्धलेखना संबंधी दोष :
अक्षरांचे वळण सर्वत्र सारखे नसणे, अक्षरांचा योग्य आकार नसणे, दोन अक्षरांत, दोन शब्दांत योग्य अंतर नसणे, शब्दावर शिरोरेखा न देणे, लेखनात खाडाखोड असणे इत्यादी शुद्ध लेखनासंबंधी दोष आहेत.
उपाय :
1. मुलांना पेन, पेन्सिल योग्य रितीने फक्त दोन बोटांनी पकडण्याची सवय लावणे,
2. मुलांना रेषा, वर्तुळ, अर्धवर्तुळ रेखाटण्याचा सराव देणे.
3. तीन रेघी, दोन रेघी वह्यांचा वापर करणे.
4. मुलांना सरळ रेषेत लेखनाची सवय लावणे.
5. दोन अक्षरांत, दोन शब्दांत योग्य अंतर ठेवण्याचा सराव घेणे.
6. चांगल्या हस्ताक्षरांचे नमुने विद्यार्थ्यांना दाखवणे.
7. शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेणे.
आ) शुद्धलेखनासंबंधी दोष :
-हस्व-दीर्घचा दोष. उदा. दीन - दिन, सुर-सूर, वर्णाचा अयोग्य क्रम उदा. कमळ ऐवजी कळम,
जोडाक्षरातील वर्णाचा अयोग्य क्रम उदा. पत्नी ऐवजी पन्ती, वाक्यात शब्दाचा अयोग्य क्रम सुविचार पाठ मीना करते, शब्दांमध्ये अयोग्य अक्षरे विष ऐवजी विश, पाणी ऐवजी पानी, लिंग, वचानाचा अयोग्य वापर, उदा. चिमणी उडाला, चार आंबे होता. अनुस्वराचा अयोग्य वापर उदा, तूप- तूप, संबंध-संबंध, रफारचा अयोग्य वापर उदा. आशीर्वाद - आर्शिवाद, विरामचिन्हांचा अयोग्य वापर. इत्यादी शुद्धलेखनासंबंधी दोष दिसून येतात.
उपाय :
1. हस्व दीर्घाचे नियम विद्यार्थ्यांना समजून सांगणे.
2. विरामचिन्हांच्या वापराविषयी माहिती देणे.
3. विद्यार्थ्यांना अवांतर वाचन देणे.
4. विद्यार्थ्यांना अनुलेखन, दृकलेखन व श्रुतलेखन देणे..
5. विद्यार्थ्यांना दररोज ठराविक शुद्धलेखन देणे. ते शिक्षकांनी वेळोवेळी तपासून योग्य त्या
6. दुरुस्त्या करणे.
7. शुद्धलेखनाचे नमुने विद्यार्थ्यांना दाखवणे,
8. शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करणे.
9. शिक्षकांनी स्वत: च्या शुद्धलेखनासंबंधी दक्षता घेणे.
वार्तालाप में शामिल हों